Manchar : बाहेर जाऊन येते असं सांगून गेलेल्या तीन तरुणी चार दिवसांपासून बेपत्ता

Three girls have been missing since four days बेपत्ता झालेल्या तिन्ही तरुणींचे वय 18 वर्षे इतके आहे.

एमपीसी​ न्यूज ​- पुणे जिल्ह्याच्या ​आंबेगाव तालुक्यातील तीन वेगवेगळ्या गावातील तीन तरुणी ह्या मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. कुटुंबियांना त्या बाहेर जाऊन येते असं सांगून गेल्या त्या अद्याप परतल्याच नाहीत. चार दिवसांपूर्वी निघून गेलेल्या या तरुणी अद्यापही घरी परत न आल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पुणे ग्रामीण पोलीस आता या तरूणींचा शोध घेत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेठ पारगाव, डोबी मळा, आणि मेंगडेवाडी येथील या तरुणी आहेत. या तीनही तरुणींची वय 18 वर्षे इतकी आहेत. सुरुवातीला या तीनही तरुणीच्या वडिलांनी इथे कुठे आसपास मैत्रिणी कडे गेल्या असतील असे समजून त्यांची वाट पाहिली. परंतु त्या जाऊन आता चार दिवसांचा कालावधीही लोटला. या कालावधीत त्यांनी मंचर शहर, गाव, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु अद्यापही या मुलींचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
दरम्यान पोलिसांकडूनही या मुलींचा शोध घेण्याचे कसून प्रयत्न सुरू आहेत. या तीन तरुणी कोणालाही आढळून आल्यास त्यांनी मंचर पोलीस स्टेशनशी 02133 – 223159 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक गिलबिले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.