Kalewadi : दहा जणांच्या टोळक्याकडून तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज –  दहा जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास काळेवाडी (Kalewadi) फाटा येथे घडली.

Chikhali : हॉटेलमध्ये फुकट जेवण न दिल्याने राडा; तिघांवर गुन्हा दाखल
इम्रान इब्राहीम शेख (वय 35, रा. थेरगाव), शाकीर ताहीर सय्यद (रा. साळूम्ब्रे, ता. मावळ), हाजीमलंग दौलत शेख (रा. चिखली) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. इम्रान यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार झहीद अन्सारी, फैज अन्सारी, शोएब अन्सारी, आदिल अन्सारी, खुराशिद अन्सारी, अनिब शेख, प्रतिक (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इम्रान आणि त्यांचे दोन मित्र काळेवाडी फाटा येथून जात होते. त्यावेळी आरोपी झहीद याने त्यांना थांबवले. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांना लाकडाने, कोयत्याने, रॉड, दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.