Today’s Horoscope 04 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 04 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 04.02.2024.

शुभाशुभ विचार – 7  नंतर चांगला.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सायंकाळी 04.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – विशाखा 07.21 पर्यंत नंतर अनुराधा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————–

मेष – ( शुभ रंग – लाल)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटनांचा सामना करावा लागेल. रिकामटेकडे वाद व चर्चा टाळून आज फक्त कृतीला प्राधान्य द्या. कोणालाही मोफत सल्ले देऊ नका.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

नोकरीत साहेबांशी व घरी जोडीदाराशी सुसंवाद राहील. कार्यक्षेत्रातील काही किरकोळ अडचणींना धैर्याने तोंड द्याल. आज इतरांच्या भानगडीत तुम्ही विनाकारण डोकवाल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

आज काही मनाविरुद्ध घटना मनाला बेचैन करतील. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा विषय काढूच नका.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही तुम्ही खर्च कराल. गूढशास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

सिंह -( शुभ रंग – आकाशी)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.

कन्या – ( शुभ रंग- मोरपिशी)

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा ठेवू नये.

तूळ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पाय धुळ झडतील. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा.

वृश्चिक – ( शुभ रंग – चंदेरी)

आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावध रहा.

धनु – (शुभ रंग- केशरी)

संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. आज दिवस खर्चाचा आहे. बचतीचा विचारच सोडून द्या. आज तुम्ही गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. वादविवाद मात्र टाळा.

मकर – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. जे जे चिंताल ते ते होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरागुती प्रश्र्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघडच जाईल.

मीन – ( शुभ रंग- मरून)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावा लागणार आहे. आपल्या कुवती बाहेर असलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.