Maharashtra: मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला-छगन भुजबळ

एमपीसी न्यूज : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Maharashtra)यांनी आज राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे.

नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते म्हणाले विरोधी पक्षातले लोक मला म्हणतात राजीनामा द्या. मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री म्हणाले वाच्यता नको म्हणून मी शांत राहिलो.

मी राजीनामा दिला आहे. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, असं (Maharashtra)छगन भुजबळ म्हणाले . 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती. त्याआधीच राजीनामा दिला होता असही भुजबळ म्हणाले.

PCMC : अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज जळीत कक्ष उभारणार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली.

तुमची शपथ पूर्ण झालीय. मराठा समाजाला आरक्षण मिळालंय. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.