Today’s Horoscope 06 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  शनिवार. …. ​दि​.  06 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार –क्षयदिन.
  • आज विशेष – साधारण दिवस
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र – अनुराधा 17.18 पर्यंत नंतर ज्येष्ठा.
  • चंद्र राशी – वृश्चिक.

 

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – राखडी)
आज वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा आपले मत मांडण्याची घाई नको. वाहनाच्या वेगावर ताबा असलेला बरा. आज फक्त स्वार्थाचे पहा, परमार्थाच उद्या पाहता येईल.

वृषभ – ( शुभ रंग – जांभळा)
वैवाहिक जीवनात असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी भागीदारांचे एक मत राहील आनंदी दिवस. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.

मिथुन – ( शुभ रंग – सोनेरी)
व्यावसायिकांची जुनी उधारी वसूल होईल. दुकानात ग्राहकांची वर्दळ वाढू लागेल. प्रामाणिक कष्टासाठी दैव अनुकूल असेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा पोट बिघडेल.

कर्क – ( शुभ रंग- चंदेरी)
घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल योग्य माणसे आज संपर्कात येतील.  प्रेमवीरांना समोरून होकार मिळेल. अनुकूल दिवस.

सिंह – (शुभ रंग – गुलाबी)
कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याकडे तुमचा कल राहील. आज गृह उद्योग तेजीत चालणार आहेत. घराच्या सजावटीसाठी शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.

कन्या – ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी)
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा प्रयत्न कराल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारी मदतीला धावून येतील.

तूळ – ( शुभ रंग -आकाशी )
आज तुमसे मनोबल उत्तम राहील आवक पुरेशी जरी असली तरी खर्चावर लगाम गरजेचा आहे. विवाहेच्छुक मंडळींचे एखाद्या समारंभात सुत जुळू शकेल.

वृश्चिक – ( शुभ रंग – पिस्ता)
आज घराबाहेर रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अति बडबड करू नका तुमचीच काही गुपिते आज उघड होऊ शकतील. अहंकार दुखावणारी एखादी घटना घडेल.

धनु – (शुभ रंग- भगवा)
तुमच्या चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. ज्येष्ठांना डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. खर्च प्रमाणाबाहेर जाणार आहे. दूरच्या प्रवासात सामानाची काळजी घ्या.

मकर – ( शुभ रंग – मरून)
कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील मोठ्या लोकात असलेली तुमची उठबस फायदेशीर राहील. आज एखादा आकस्मिक धनलाभ होऊ शकेल. मित्रांसाठी मनापासून खर्च कराल.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
 तुमच्या कामातील उत्साह तुमच्या सहकाऱ्यांना प्रेरणा देईल. आज तुम्ही कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी मात्र वरिष्ठांचा वचक जाणवेल.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करायची असतील तर अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनाचा दर्जाही वाढवणे गरजेचे आहे. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.