Today’s Horoscope 07 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

07. 05. 2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

 राहू काळ – सायंकाळी 04.30  ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- अनुराधा 20.21  पर्यंत नंतर ज्येष्ठा.

चंद्र राशी – वृश्चिक.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

आज फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊन शब्दात अडकू नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी सावधगिरीने चालवा.

वृषभ (शुभ रंग- केशरी)

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हाऊस मौज करताना कायद्याचे भान ठेवा. सतर्क रहा.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे आवश्यक आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

कर्क (शुभ रंग- आकाशी.)

आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय किंवा सौंदर्य प्रसाधनांचे व्यावसाय चांगले चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागू शकतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता)

बेरोजगारांना रोजगाराच्या उत्तम संधी चालून येतील. एखादा पत्ता शोधण्यासाठी आज वणवण होईल. एखाद्या रिकामटेकड्या चर्चेतून निष्पन्न काहीच होणार नाही, कृतीस प्राधान्य द्यावे.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहजच उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पडतील आज आनंद दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे चालून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळ खर्च करू शकाल. इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्ती कराल.

धनु- (शुभ रंग- भगवा)

खर्चाचे प्रमाण कितीही वाढले तरी पैसा कमी पडणार नाही कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या.

मकर ( शुभ रंग- गुलाबी )

तुम्ही केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरी पडेल. तुमचे पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

कुंभ (शुभ रंग – मरून)

नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश आहेत अशा भ्रमात राहू नका. कार्यक्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. आज प्रयत्नांती परमेश्वर.

मीन -(शुभ रंग – निळा )

उद्योगधंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस काहीसा प्रतिकूल आहे. नोकरीच्या ठिकाणी साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही अकस्मिक अडचणींना तोड द्यावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यशाची खात्री.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.