Today’s Horoscope 09 February 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग – वार – मंगळवार, ​दि​. 09 फेब्रुवारी 2021

  • शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस.
  • आज विशेष – भौमप्रदोष.
  • राहू काळ – सकाळी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 14.39 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • चंद्र राशी – धनु 20.30 पर्यंत, नंतर मकर

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – मोतिया)

नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहावे. तरुणांनी व्यसने व कुसंगत टाळावी. ज्येष्ठ मंडळींना सत्संगाची ओढ लागेल. काहीजण तीर्थक्षेत्री प्रवासाचे बेत आखतील.

वृषभ – (शुभ रंग – निळा)

कामधंद्यातील काही अडचणी तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. विश्वासू माणसाकडून ही विश्वासघात होऊ शकेल. आज मोठ्या आर्थिक उलाढाली शक्यतो टाळा.

मिथुन – (शुभ रंग – डाळिंबी)

आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आशादायी दिवस.

कर्क – (शुभ रंग – पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाणार आहे. आज काही संसारिक अडचणीत पत्नीची खंबीर साथ मिळेल.

सिंह – (शुभ रंग – राखाडी)

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. तरुणांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. गृहणी बिझी शेड्युल मधूनही आपल्या आवडत्या छांदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.

कन्या – (शुभ रंग – मरून)

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आज आवक पुरेशी असेल. जागेचे प्रश्न सुटतील. आज तुम्हाला आईकडून काहीतरी लाभ संभवतो.  गृहिणी आज स्वच्छतेचे फारच मनावर घेतील. खेळाडूंनी सराव वाढवावा.

तूळ – (शुभ रंग – निळा)

आज खूपच धावपळीचा दिवस. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा उत्साह वाढेल. काहींना आज प्रवासाचे योग अटळ आहेत. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृश्चिक – (शुभ रंग – भगवा)

पूर्वीच्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ असेल. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील. आज प्रवास त्रासदायक होतील.

धनु – (शुभ रंग – आकाशी)
आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. आज तुम्हाला जरा एकांतवासाची गरज भासेल.

मकर – (शुभ रंग – डाळिंबी)
महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशा पदरात पडेल. काही कामानिमित्त बरीच पायपीट होणार आहे. पासपोर्ट विजा इत्यादी विदेश गमनासंबंधित कामे यशस्वी होतील.

कुंभ – (शुभ रंग – चंदेरी)

आज व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ओळखी होतील. वैवाहिक संबंधात गोडीगुलाबी राहील. पूर्णपणे अनुकूल असा दिवस सत्कारणी लावणे तुमच्याच हातात आहे.

मीन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज नोकरीधंद्यात अनुकूल वातावरण राहील वरिष्ठांची मर्जी सांभाळू शकाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित लाभ होईल.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.