Today’s Horoscope 10 February 2024  – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज  -आजचे पंचांग-Today’s Horoscope 10February 2024  – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग-
आजचा दिवस – शनिवार.
तारीख – 10.02.2024.
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – धनिष्ठा 20.34 पर्यंत नंतर शततारका.
चंद्र राशी – मकर 10.02 पर्यंत नंतर कुंभ.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)
आज दिवस लाभाचा असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा  दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ संभवतो. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.
वृषभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. आज खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. नोकरीत साहेब जितके विचारतील तितकेच बोला. लवकर घर गाठा.
मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)
दूरच्या प्रवासात झालेल्या काही नव्या ओळखी भविष्य काळात तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. ज्येष्ठ मंडळी आज तीर्थयात्रेचे बेत आखतील.
कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

महत्त्वाच्या कामात थोडेफार अडथळे येतील. आज आपल्या आवाक्या बाहेरच्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका  मोठ्या रकमेची ने आण करताना सावध असावे.
सिंह -( शुभ रंग – मरून)
उद्योगधंद्याच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घेणे हिताचे राहील.
कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
नोकरदारांना अधिकारी वर्गाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. कामाच्या व्यापात तब्येतीच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.
तूळ ( शुभ रंग- भगवा)
उच्चशिक्षितांच्या महत्त्वकांक्षा व अपेक्षाही वाढतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल असेल. नवविवाहित मंडळींना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.
वृश्चिक ( शुभ रंग – हिरवा)
बरेच दिवसांपासून दुर्लक्षित झालेल्या घरगुती कामांकडे आज लक्ष द्यावेसे वाटेल. मुलांचे लाड आवरते घेऊन त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
धनु (शुभ रंग- चंदेरी)
रिकाम टेकड्या गप्पांत आज बराचसा वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. तुमची काही गुपिते आज उघड होतील. कमी बोलून आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.
मकर (शुभ रंग- पांढरा)
आज कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. गृहिणी अनपेक्षित पणे येणाऱ्या पाहुण्यांची उठबस आज आनंदाने करतील.
कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल. बरेच दिवसापासून गहाळ झालेली एखादी वस्तू आज अचानक सापडेल. आपल्या आवडत्या छंदास तुम्ही वेळ द्याल.
मीन ( शुभ रंग- सोनेरी)
दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करायला हवा. आज कंजूषणाचा काहीही उपयोग नाही. तातडीने दूरच्या प्रवासाला निघणाऱ्यांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.