Maval : वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव खुर्द येथे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटी (Maval )कामशेत संस्थापक स्व. दिलीपभाऊ टाटीया यांच्या पुण्यतिथीनिमित्त वरसुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव खुर्द येथे लायन्स क्लब तळेगाव दाभाडे व जनरल हॉस्पिटल तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

माळेगाव खुर्द गावातील 140 ग्रामस्थांनी नेत्र तपासणी,(Maval ) रक्तदाब, मधुमेह आदी तपासण्या करून घेतल्या. मोफत 39 चष्मे वाटप करण्यात आले, 38 केट्रॅकचे पेशंट आढळून आले. कार्यक्रमासाठी लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे, लायन प्रियंका काळोखे, तळेगाव जनरल आय हॉस्पिटलच्या डॉ. अनामिका सिंग, डॉ. गार्गी मेहता, प्राध्यापक राजेश गायकवाड, इतर स्टाफ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.

Alandi: एम आय टी महाविद्यालयातील इनोवेशन सेल तर्फे उद्योजकता आणि अभिनवता कॅरिअर संधीयावर एक दिवसीय कार्यशाळे आयोजन

विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. लायन अध्यक्ष डॉ. अनिकेत काळोखे यांनी स्वागत केले. किशोर चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर शाळेने भोजनाची व्यवस्था केली होती त्याचा सर्वांनी लाभ घेतला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.