Alandi: एम आय टी महाविद्यालयातील इनोवेशन सेल तर्फे उद्योजकता आणि अभिनवता कॅरिअर संधीयावर एक दिवसीय कार्यशाळे आयोजन

एमपीसी न्यूज -दि.9  रोजी आज एम आय टी महाविद्यालयातील (Alandi) इनोवेशन  सेल तर्फे उद्योजकता आणि अभिनवता कॅरिअर संधीयावर  एक दिवसीय कार्यशाळे आयोजन करण्यात आले होते.
सौरभ मंगरुलकर संस्थापक, इव्हेंटबीप टेड स्पीकर, शार्क टँक(Alandi) इंडिया ग्लोबल स्टूडेंट एंट्रेप्रेन्योर पुरस्कार प्राप्तकर्ता यांनी  “उद्योजकता आणि अभिनवता कॅरिअर संधी” वर कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
यामध्ये  इनोव्हेशनमध्ये व्यवसाय मॉडेल, उत्पादन, कल्पना किंवा सेवा यासारखे काहीतरी नवीन सादर करणे समाविष्ट असले तरी, उद्योजकता एक उत्तम कल्पना व्यवहार्य व्यवसाय संधीमध्ये बदलण्यावर लक्ष केंद्रित करते.

नवोन्मेष हा उद्योजकतेचा प्रारंभिक बिंदू आहे, कारण त्यात नवीन आणि मौल्यवान कल्पना तयार करणे समाविष्ट आहे त्यांनी उजरी अनेक उद्योजक कंपनी तयार करण्यासाठी आणि चालवण्यासाठी त्यांच्या कौशल्यांचा वापर करतात, इतर व्यवसाय व्यवस्थापक, वित्त व्यवस्थापक, आर्थिक विश्लेषक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यासारख्या संबंधित नोकरी करतात.
या संदर्भात मार्गदर्शन केले . या एक दिवसीय कार्यशाळेत  88 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला . याचे आयोजन इनोवेशन  सेलचे प्रमुख प्रा. अभिजित नेटके यांनी केले होते याचे  उद्घाटन प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उप प्राचार्या , प्रा. अक्षदा कुलकर्णी यांनी केले.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.