Nigdi : यमुनानगर येथे एमएनजीएल लाईन लीक

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथे एमएनजीएल गॅस लाईन (Nigdi) लिकेज झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

यमुनानगर येथे बांधकाम साईट सुरू आहे. या साईट जवळ जेसीबीच्या सहाय्याने काम करत असताना एमएनजीएल गॅस लाईन लिक झाली. घटनेची माहिती मिळताच सुरवातीला प्राधिकरण उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

त्यानंतर वल्लभनगर आणि तळवडे येथील अग्निशमन दलाच्या पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

Alandi : इंद्रायणी नदी पुन्हा मोठ्या प्रमाणात फेसाळली

अग्निशमन दलाच्या जवानांनी एमएनजीएम प्रशासनाशी संपर्क केला. (Nigdi) गॅस लाईन बंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर लीकेज काढण्यात येणार आहे. गॅस लाईन लीक झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस पसरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.