Pune : पुणे लोकसभेला नगरसेवकांना करावे लागणार काम

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभेची निवडणूक येत्या काही (Pune) दिवसांतच जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुणे महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांना आपापल्या पक्षाचा प्रचार करावा लागणार आहे.

आधी लोकसभा नंतर विधानसभा आणि त्या नंतर पुणे महापालिका निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मागील 2 वर्षांपासून पुणे महापालिकेत प्रशासकीय राज सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांचे महत्त्व कमी झाले आहे.

सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांची कामे मात्र ताबडतोब होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सध्या पुणे शहरावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे या पाक्षाचे मातब्बर नगरसेवक अजित पवार यांच्याकडून आपआपली कामे करून आणतात.

राष्ट्रवादीत 2 गट पडल्यावर अजित पवार गटाची सध्या चांगलीच (Pune) चलती आहे. पुणे माहापालिका निवडणूक जसजशी लांबत आहे. तसतशी इच्छुक उमेदवारांची संख्याही कमी होत आहे. आता सध्या सर्वच नगरसेवक माजी झाले आहेत.

Nigdi : यमुनानगर येथे एमएनजीएल लाईन लीक

त्यामुळे कार्यकर्ते सांभाळताना नाकीनऊ येत आहे. तरीही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक उपस्थित राहून चर्चेत आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुती आणि माहाविकास आघाडी अशी लढत होणार आहे.

जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार आहे. तर, विरोधी पक्षाकडून काँग्रेसचा उमेदवार असेल. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर भाजपने आपला झेंडा प्रस्थापित केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.