Alandi : इंद्रायणी नदी पुन्हा मोठ्या प्रमाणात फेसाळली

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदी काठच्या गावातील मैला मिश्रित (Alandi) सांडपाणी तसेच कारखान्यातील केमिकल युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे.दि.9 रोजी आळंदी येथील सिध्दबेट जवळील बंधाऱ्या खालील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले.

इंद्रायणी नदीपात्रातील पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस तरंगत होता.

या होणाऱ्या वारंवार जलप्रदूषणा मुळे नदी लगत असणाऱ्या आजू बाजूच्या कुपनलिकेवर परिणाम होत आहे.या नदीपात्रातून नदी काठच्या विविध गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्या नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच आळंदी मध्ये गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात (Alandi) आले असून हजारो भाविक आळंदीत दाखल झाले आहे. त्यातील काही भाविक पवित्र इंद्रायणी नदी मध्ये स्नान करतात किंवा पायावर पाणी घेतात.

जलप्रदूषणाच्या या पाण्यामुळे त्यांना त्वचा रोग ही होऊ शकतो. काही भाविक आचमन ही करतात.त्यामुळे त्यांचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

हे जलप्रदूषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य त्याबाबत उपाय योजना करणे गरजे आहे. हे जलप्रदूषण करणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी स्थानिक नागरिकांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.