Today’s Horoscope 12 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – शनिवार, 12 जून  2021

  • शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.00.
  • दिशा शूल – पूर्वेस असेल.
  • आजचे नक्षत्र -आद्रा 16.56 पर्यंत नंतर पुनर्वसु.
  • नक्षत्र पया- चांदी.
  • चंद्र राशी –  मिथुन

आजचे राशीभविष्य

मेष –  ( शुभ रंग -पिस्ता )

नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी साठी काही संधी चालून येतील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत होईल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क राहायला हवे.

वृषभ – ( शुभ रंग -राखाडी )

आज काही येणी असतील तर वसूल होतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. बेरोजगारांची वणवण थांबेल.

मिथुन –  ( शुभ रंग -पांढरा )

आज तुमच्या कामातील उरक चांगला असून नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. आज मुले मनापासून अभ्यास करतील.

कर्क – ( शुभ रंग- जांभळा )

आज भावना व कर्तव्य यात तुमच्या मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने सोडवावे लागतील. जमाखर्चाचा ताळमेळ बसवताना नाकीनऊ येतील.

सिंह –  ( शुभ रंग- क्रीम )

मित्र आज दिलेली आश्वासने नक्की पाळतील. क्षुल्लक कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हाती असलेले पैसे जपूनच वापरा. संध्याकाळी एखादा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या – ( शुभ रंग – निळा )

उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होणार आहे. घरातील थोरांचे सल्ले अवश्य घ्या. त्यांच्या वयाचा मान राखा.

तूळ – ( शुभ रंग – गुलाबी )

 कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. आज तुम्ही गरजूंना मदत करणार आहात. आपल्याही मिळकतीचा अंदाज घ्या.

वृश्चिक – ( शुभ रंग- मोतिया)

आज व्यवसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर ठाम राहू शकाल. जोडीदाराच्या भावना जपण्याचा आज प्रयत्न कराल.

धनु – ( शुभ रंग- सोनेरी)

आज नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम कराल. वाढीव जबाबदाऱ्या सकारात्मकतेने स्वीकाराल. आज तुम्ही घाईगर्दीत घेतलेला एखादा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

मकर –  (शुभ रंग – भगवा)

आज तुम्हाला मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तिस प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

कुंभ – ( शुभ रंग – डाळिंबी )

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. नवे परिचय होतील. रसिक मंडळी आज जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील बहरतील आरोग्य उत्तम साथ देईल.

मीन –  (  शुभ रंग – केशरी)

महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. आज आनंदाच्या भरात कुणाला ही वचने देऊ नका ती पाळता येणार नाहीत. मुलांचे लाड आवडते घ्या, त्यांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागारToday’s Horoscope 10 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.