Today’s Horoscope 14 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

14.10.2023.

शुभाशुभ विचार- अमावस्या वर्ज्य. 

आज विशेष- सर्वपित्री अमावस्या, अमावस्या श्राद्ध.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र –  हस्त 16.24 पर्यंत नंतर चित्रा

चंद्र राशी – कन्या.

————————————

मेष – ( शुभ रंग- सोनेरी )

व्यावसायिक स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे आहेत. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. कामाचा व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष नको.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. प्रेम प्रकरणांना घरातील थोरांचे आशीर्वाद मिळतील. गृहिणी आज व्यक्तिमत्व विकासावर भर देतील.

मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )

आज तुमच्यासाठी गृहसंख्यचा दिवस असून आज घरी आराम करायचा तुमचा मूड असेल. आज थोडे मुलांच्या अभ्यासात डोकवावे लागणार आहे. आईचे मन दुखावू नका.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज कार्यक्षेत्रात सावधपणे पाऊले टाकायला हवीत अहंकारास लगाम घालून अनुभवींचे सल्ले घेणे गरजेचे आहे. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. वादविवाद टाळावेत.

सिंह (शुभ रंग- चंदेरी )

आज कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वास व कर्तुत्वास ही वाव मिळेल. अती स्पष्ट बोलण्याने काही नाती दुरावतील. खरे बोलण्यापेक्षा आज गोड बोलणे हिताचे राहील.

कन्या ( शुभ रंग- लाल )

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन या आधारे कार्यक्षेत्रात तुमच्या यशाचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने मनोबल उत्तम असेल.

तूळ ( शुभ रंग- मोतिया )

आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा वडीलधाऱ्यांचा मान राखा.

वृश्चिक (शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

धनु (शुभ रंग- पांढरा)

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मोडू नका.

मकर ( शुभ रंग- आकाशी)

आज आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. दैव तुमच्या पाठीशी आहेच.

कुंभ (शुभ रंग – राखाडी )

भागीदारीत आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करा. मुलांनी कुसंगती पासून लांबच राहावे. पालक हिताचे सल्ले देतील. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी )

नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमाचे तुम्हाला फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात मान मिळेल. जोडीदारास अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून आज घडेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424 .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.