Today’s Horoscope 15 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 October 2022
शनिवार.
तारीख 15.10.2022
शुभाशुभ विचार- सामान्य दिवस दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- मृग 23.22 पर्यंत नंतर आर्द्रा.
आजची चांद्रारशी – वृषभ 10.01 पर्यंत नंतर मिथुन.
————————————–
मेष – शुभ रंग – राखाडी
नवीन व्यावसायिकांनी आपली आर्थिक कुवत ओळखूनच गुंतवणूक करावी. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील घराबाहेर वावरताना रागावर लगाम ठेवा. शब्द जपून वापरा.

वृषभ- शुभ रंग- पिस्ता
दिवसाच्या पूर्वार्धात काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज तुम्ही प्रवासाची दगदग टाळावी. अहो पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य द्यावे.

मिथुन- शुभ रंग- मोरपंखी
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

कर्क- शुभ रंग- हिरवा (Today’s Horoscope 15 October 2022)
आर्थिक व्यवहारात सतर्क असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्या शब्द देऊ नका. दानधर्म करतानाही आधी स्वतःची शिल्लक तपासून घ्यायला हवी. वडीलधाऱ्या मंडळींना दुखावू नका.

सिंह – शुभ रंग- गुलाबी
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

कन्या- शुभ रंग- सोनेरी
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनच्या मार्गातील अडथळे आता दूर होतील. अधिकार योग चालून येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, वडील आज अत्यंत उपयुक्त सल्ले देतील.

तूळ- शुभ रंग – आकाशी
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल पण तो टाळा. स्वतःवर जरा संयम असू द्या.

वृश्चिक – शुभ रंग – पांढरा
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार सगळे उद्यावरच ढकला. धाडसाची कामे आज नकोतच. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

धनु – शुभ रंग – जांभळा
महत्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत भागीदाराच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका.

मकर – शुभ रंग – मरून
नोकरांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल जुनी दुखणी अंगावर काढू नका पती-पत्नी मधील काही मतभेद आज संध्याकाळी निवळतील.

कुंभ – शुभ रंग – केशरी
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल आज काही बिकट प्रश्न चुटकीसरशी सुटतील. विवाह विषयक बोलणी होकारार्थी पार पडतील. उत्साहपूर्ण दिवस.

मीन – शुभ रंग – चंदेरी
मंदावलेल्या व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. ठावराची खरेदी विक्री फायद्यात राहील प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Chakan fire : चाकण येथे एका टपरीला गॅस गळतीमुळे आग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.