Chakan fire : चाकण येथे एका टपरीला गॅस गळतीमुळे आग

एमपीसी न्यूज : चाकण येथे एका टपरीला गॅस गळतीमुळे (Chakan fire) संध्याकाळी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण आणले.

Pune railway : पुणे – दौंड सेक्शन मध्ये 16 ऑक्टोबर रोजी ब्लॉक

याबाबत विजय पवार, लीडिंग फायरमन, चाकण एमआयडीसी अग्निशमन विभाग यांनी सांगितले की, आज संध्याकाळी 6:00 वाजण्याच्या आसपास आग लागली असल्याची वर्दी मिळाली.(Chakan crime) चाकण म्हाळुंगे रोडवरील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक च्या जवळ एका टपरीमधील गॅस सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने ही आग लागली होती. एक अग्निशमन बंब लगेच घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासामध्ये आग विजवण्यात आली. सिलेंडर वर पाणी मारून तो थंड करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.