Indrayani River Pollution : इंद्रायणी नदी पुन्हा रसायनयुक्त पाण्याने फेसाळली

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पालिका (Indrayani River Pollution) हद्दीतून तसेच इंद्रायणी नदी काठच्या गावातून इंद्रायणी नदीत मैलमिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने दि.14 ऑक्टोबर रोजी रासायनिक पाण्याने इंद्रायणी पुन्हा फेसळलेली दिसून आली.

आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. रोज अनेक भाविक माऊलींच्या समाधी दर्शनासाठी येत असतात. व इंद्रायणी नदी ही पवित्र नदी म्हणून ओळखली जात असल्याने त्यात भाविक स्नानही करतात. येथील नदीपात्रात स्नान केल्यास या प्रदूषित पाण्याने नागरिकांना त्वचारोग ही संभवतात. तसेच, येथील इंद्रायणी नदीतील पाणी दूषित असल्याने नदीपात्रातील हे पाणी पिण्यासाठी मनाई आहे.

Today’s Horoscope 15 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

8 ऑक्टोबर रोजी आळंदी येथे एका कार्यक्रमामध्ये (Indrayani River Pollution) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना एक वारकरी युवकाने मध्ये उठून इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेवर लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता इंद्रायणी नदीच्या काठी असणाऱ्या गावातून मोठ्या प्रमाणात रासायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर महाराष्ट्र शासन कोणती कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.