Today’s Horoscope-18 मे 2023:आजचे राशीभविष्य

आजचे पंचांग –
वार – गुरूवार.
18.05.2023.
शुभाशुभ विचार – चतुर्दशी वर्ज्य दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- अश्विनी 7.23 पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जिद्द आज तुम्ही बाळगाल. विरोधकांनाही तुमची मते पटवून देऊ शकाल. जेष्ठ मंडळींनी  काळजी घेणे गरजेचे आहे.
वृषभ (Show रंग- राखाडी )
घरातील थोर मंडळींच्या विचारांशी मिळते जुळते घेऊन त्यांच्या वयाचा मान राखाल. आज एखादा अनपेक्षित खर्च उद्भवेल जो टाळता येणे शक्य नाही. घराबाहेर आज वाद टाळावेत.
मिथुन ( शुभ रंग- हिरवा) 
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दाला मान राहील.
कर्क (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागाल. पण अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. मित्र आज चुकीचे सल्ले देतील. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान देणे हिताचे आहे.
सिंह ( शुभ रंग – मोरपंखी)
नोकरी धंद्यात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची आज तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार आहे. प्रामाणिक प्रयत्नांना दैव अनुकूल राहील.
कन्या ( शुभ रंग- चंदेरी)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. महत्त्वाच्या चर्चेत आज आपले मत मांडण्याची घाई करू नका. प्रलोभनांच्या आहारी जाण्याने फसवणूक संभवते.
तूळ ( शुभ रंग- निळा)
आज केवळ भिडस्तपणा पायी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न जरूर करा.
वृश्चिक (शुभ रंग डाळिंबी )
आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी थोडे नमतेच घ्यावे. आज काही येणी असतील तर वसूल होतील.
धनु- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. तरुण वर्गात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. थोडी अहंकाराची ही बाधा होईल. नवोदित कलाकारांना उत्तम संधी चालून येतील.
मकर ( शुभ रंग- जांभळा )
गृहिणी आज घराची शोभा वाढवण्यासाठी पैसा खर्च करतील. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. प्रेमी युगुलांनी तर आज मौनव्रत ठेवणे हिताचे राहील.
कुंभ (शुभ रंग – क्रीम )
वास्तु व वाहन खरेदीचे विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त   रमतील कदाचित वाहन रस्त्यात नादुरुस्त होऊ शकते, काळजी घ्या.
मीन -(शुभ रंग – आकाशी )
एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज तुम्ही गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल. दुरावलेल्या मित्रांमधील गैरसमज दूर होतील व सलोखा वाढेल.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.