Today’s Horoscope 18 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 September 2022

वार – रविवार.

तारीख 18.09.22

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – अष्टमी श्राद्ध.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- मृग 8.27 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी- मिथुन


आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- राखाडी

अधिकारी वर्गास ऑफिस कामासाठी प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोपतात येतील. गृहिणी शेजार धर्म पाळतील.

वृषभ- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

व्यवसायात आज आवक मनासारखी राहील. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारावी लागेल. कार्यक्षेत्रात तुमचा आज चांगला प्रभाव पडेल. वक्ते व्यासपीठ गाजवतील.

मिथुन- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी खर्चही कराल. फारच सडेतोड बोलून कुणाच्या भावाना मात्र दुखावू नका.

कर्क- शुभ रंग- क्रीम

काहीजणांना तातडीने दूरच्या प्रवासास निघावे लागेल. आज वायफळ खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण असणे गरजेचे.

सिंह -शुभ रंग- केशरी

शरीव्यावसायिकांची आर्थिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्न साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

कन्या- शुभ रंग- डाळिंबी

आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांच्या फार नादी लागू नका.

तूळ- शुभरंग- लाल

उद्योग धंद्याच्या दृष्टीने आजचा दिवस प्रतिकूलच आहे. नोकरीतही तुम्हाला वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. आज नास्तिकही देवाला एखादा नवस बोलून बघतील.

वृश्चिक- शुभ रंग- आकाशी

आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्याची वेळीच दखल घ्या. आज धाडसाची कामे टाळा झटपट लाभाचा मोह बाळगला तर निराशा पदरी पडेल. विवाह विषयक बोलनी आज नको.

धनु- शुभ रंग- निळा

व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावाखाली राहील. पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

मकर- शुभरंग- जांभळा

नोकरदारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. आज तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ- शुभरंग- गुलाबी

तरुण वर्गाचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हाऊस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. आज प्रकृती धडधाकट राहील.

मीन- शुभरंग- पांढरा

नोकरदरांना ऑफिसला दांडी मारायचा आज मूड असेल. गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील मुलांची अभ्यासात चांगली प्रगती दिसून येईल. काही कर्ज प्रस्ताव केले असतील तर ते मंजूर होतील.

 

 

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.