Today’s Horoscope 23 July 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग  वार – शुक्रवार दि. 23 जुलै 2021
            
  • शुभाशुभ विचार- प्रतिकूल दिवस.
  • आज विशेष – गुरुपौर्णिमा.
  • राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
  • दिशा शूल – पश्चिमेस असेल.
  • आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 14.26 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
  • चंद्र राशी –  धनु 19.58 पर्यंत नंतर मकर.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पिस्ता)

आज कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात टाळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल, काही सज्जनांचा सहवास लाभेल. तुमचे विचार प्रगल्भ होतील.

वृषभ – ( शुभ रंग- लाल)

सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करू नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तरव्या लागणार आहेत. वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत.

मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)

आपल्या अती सडेतोड बोलण्याने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमध्ये न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

कर्क – (शुभ रंग- क्रीम)

कुणाकडून येणी असतील तर ती मागायला लाजू नका. पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे होणे हिताचे आहे. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज भासेल.

सिंह– ( शुभ रंग- हिरवा)

उच्चशिक्षित असाल तर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. प्रतिष्ठितांच्या ओळखीतून आपला स्वार्थ साधून घेता येईल. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कष्टांचा हि अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण हे लक्षात असू द्या. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क कसे करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

तूळ – (शुभ रंग – मरून)

घर दुरुस्तीच्या काही किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. घर खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. शेजारी आज आपलेपणाने डोकावतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- जांभळा)

व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर अडून बसाल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनु – (शुभ रंग – निळा)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका. एखादी गहाळ झालेली वस्तू आज अचानक सापडेल.

मकर – ( शुभ रंग- भगवा)

बेरोजगारांनी रोजगारासाठी घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवायला हवी.  आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपून वापरावी.

कुंभ – ( शुभ रंग- मोतिया)

आज तुमचे मनोबल उत्तम असून काही मनासारख्या घटना घडतील. दैनंदिन व्यवहार विनाव्यत्यय पार पडतील. वास्तू किंवा वाहन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील.

मीन – (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक घटना घडतील. नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण जाणवेल. ऑफिस कामाच्या व्यापात कौटुंबिक गरजा दुर्लक्षित होतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.