Today’s Horoscope 23 November 2022 जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 November 2022
वार – बुधवार.
23.11.2022
शुभाशुभ विचार- क्षयदीन.
आज विशेष- दर्श अमावस्या.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – विशाखा.
चंद्र राशी – तुळ 16.04 पर्यंत नंतर वृश्चिक.

—————————————-
मेष – ( शुभ रंग- मरून )
महत्वाची सर्व कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. दुपारनंतर दिवस तितकासा अनुकूल नाही. नवीन ओळखीत फक्त रामराम करा. कोणताही आर्थिक व्यवहार नको.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
धंद्यात येणी वसूल होतील. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगली जमेल. वैवाहिक जीवनात आज दुपारनंतर सुसंवाद घडेल.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
आज चैनी व विलासी वृत्ती बळावेल. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज चांगले चालतील. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

कर्क (शुभ रंग- गुलाबी.)
मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेमी युगोलांमध्ये सुसंवाद राहील. शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते मार्गी लागतील.

सिंह (शुभ रंग- चंदेरी)
आज काम कमी व दगदगच जास्त होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा आज वादस कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. आज प्रवासात जुळलेले नावे हितसंबंध भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून स्वार्थ साधून घ्यावा. आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)Today’s Horoscope 23 November 2022
तुमची तब्येत थोडीशी नरमच असेल. किरकोळ गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. जशास तसे या धोरणांनी वागा मोफत सल्लागार मंडळींचे सल्ले फारसे मनावर घेऊ नका.

strong>धनु- (शुभ रंग- केशरी )
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसापासून च्या काही इच्छा पूर्ण होतील. वाहन वास्तू खरेदीतील अडथळे दूर होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

मकर ( शुभ रंग- लाल)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य राहील. हाता खालचे लोक आदबीने वागतील. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कुंभ (शुभ रंग – आकाशी )
पर्यटनाचे व्यवसाय चांगले चालतील. आज घरात थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. थोडी भटकंती होईल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )
आजच्या दिवसाच्या पूर्वार्ध मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी तितकासा अनुकूल नाही. दुपारनंतर कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण असेल. घरात वडीलधाऱ्यांची मने जपावी लागतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.