Today’s Horoscope 24 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 24 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

24.06.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30. 

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा 07.18  पर्यंत नंतर पूर्वा.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- आकाशी )

हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल. कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील.

वृषभ (शुभ रंग- मरून )

आज कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा तुमचा मूड असेल काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे राहील. गृहिणी मुलांच्या अभ्यासात डोकावतील.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी)

शेजाऱ्यांनी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रोधावर लगाम ठेवा.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. मनी योजल ते तडीस न्याल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकतो. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

वाढत्या खर्चातही आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)

दिवस खर्चाचा असल्याने आज बचत शक्य नाही. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. मौल्यवान खरेदी होईल. काही थकीत बिले भरावी लागतील. प्रवास होतील.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)

जिथे जाल तिथे आज आपलीच मर्जी चालवायचा तुमचा प्रयत्न असेल. अति उत्साहात घेतलेले काही निर्णय चुकतील. उपवारांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

नोकरदारांना ऑफिसमध्ये आज कामाचा प्रचंड ताण असेल. कामाच्या व्यापात काही घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागण्याची शक्यता आहे. अतिव्यस्त दिवस.

धनु- (शुभ रंग- डाळिंबी)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगायला हरकत नाही. सज्जनांचा सहवास लाभेल. ज्येष्ठ मंडळींना तीर्थयात्रेचे वेध लागतील.

मकर ( शुभ रंग- मोतिया )

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज करू नका. सतर्क रहा आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

कुंभ (शुभ रंग – राखाडी)

कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असल्याने तुम्ही आज कार्यक्षेत्रात आपल्या कामासही योग्य न्याय देऊ शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

मीन -(शुभ रंग – तांबडा )

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्कीच मिळेल.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.