Today’s Horoscope 31 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 31 August 2022

वार – बुधवार

31.08.2022

शुभाशुभ विचार –आनंदी दिवस

आज विशेष – श्री गणेश चतुर्थी

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30

दिशा शूल – उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र – चित्रा 24.12 पर्यंत नंतर स्वाती

चंद्र राशी – 12.04 पर्यंत कन्या नंतर तुळ

________________________

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)

आज समोरच्या व्यक्तीवर तुमच्या प्रभावी वक्तृत्वाची छाप पडेल. आज जोडीदार तुमच्यावर खूश असेल.उपवरांना एखाद्या समारंभात आशेचा किरण दिसेल.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतील.मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे आहे.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)

नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा, कारण आज जोडीदार तुमची आतुरतेने वाट पाहत असेल.आनंदी दिवस.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)

शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील.आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.आज मातोश्री आपलेच खरे करतील.खेळाडूंनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

सिंह – (शुभ रंग – मोरपंखी)

कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडणार आहेत.आज झालेल्या प्रवासातील काही ओळखी पुढे व्यवसाय वृद्धिच्यादृष्टीने फायदेशीर ठरतील.

कन्या – (शुभ रंग- जांभळा)

आज श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तुमची आर्थिक क्षमता वाढणार आहे.मनोबल चांगले असल्याने आज तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.अनेक किचकट कामे सोपी होतील.

तुळ – (शुभ रंग – मरून)

आज तुमचा लहरी आणि हट्टी स्वभाव जरा काबूत ठेवा.कार्यक्षेत्रात आज काही प्रश्न सामंजस्याने सोडवावे लागणार आहेत.विरोधकांशी मिळतेजुळते घेऊनच स्वार्थ साधावा लागणार आहे. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील.

वृश्चिक – (शुभ रंग – नारंगी)

कंजूषपणा करून काहीही उपयोग नाही.दिवसाच्या उत्तरार्धात असा काही खर्च उद्भवेल कि जो टाळणे शक्य नाही.काही दूरच्या नातलगांची अचानक भेट होईल.

धनु – (शुभ रंग – केशरी)

काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होणार आहेत.संततीबाबत काही आनंददायी घटना घडतील. तुमची काही विसरलेली येणी आज वसूल होण्याची शक्यता आहे.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल.इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकाराल व त्या सहज पूर्ण कराल. आज तुमचे विरोधकही तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल.कितीही केलं तरी आज वरिष्ठांचे समाधान  होणे शक्य नाही.नास्तिक मंडळीही आज देवाला एखादा नवस बोलतील.

मीन – (शुभ रंग – निळा)

विरोधक सक्रिय असताना कामात चुका करून चालणार नाही.आज कोणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही.तरुणांनी गाडी चालवताना स्टंट करू नयेत.

एम.पी.सी न्यूजच्या सर्व वाचकांना आमच्याकडून श्री गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.