Today’s Horoscope 26 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 26 July 2023
वार – बुधवार
26.07.2023
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- दुर्गाष्टमी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती.
चंद्र राशी – तूळ.
—————————————-
मेष  ( शुभ रंग- मोतिया )
आज केवळ मोठेपणासाठी न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे. तब्येतीकडेही  लक्ष द्यावे लागणार आहे.

वृषभ (शुभ रंग- सोनेरी )
आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्दांचा वापर जपून करा.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा ) Today’s Horoscope 26 July 2023
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनास आनंद देतील.

कर्क (शुभ रंग- चंदेरी )
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. विद्यार्थी आज पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.

सिंह (शुभ रंग- पिस्ता )
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच रमतील.

Pune : कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज दुरावलेली नाती जवळ येतील. ज्येष्ठांना कदाचित दंत वैद्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.

तूळ ( शुभ रंग- क्रीम )
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल. थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते. कठोर बोलल्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे. कुणी मागितल्या शिवाय सल्ले द्यायला जाऊ नका.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधलीत तर सापडेल.

धनु (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. लांबच्या प्रवासात आज बेसावध राहून चालणार नाही.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. परंतु अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरायला हवा. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

मीन (शुभ रंग – मोरपंखी)
कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपून बसलेलेच आहेत. वरिष्ठांचे काहीही केले तरी समाधान होणे शक्य नाही आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळवायलाच हवीत.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.