Pune : कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी

एमपीसी न्यूज – कोथरूडमधून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे (Pune) , सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयास दिली.

Chandrayaan 3 : चंद्राच्या दिशेने अंतराळयानाची प्रवासाला सुरुवात

आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) कलम वाढ करण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

 

सत्र न्यायालयाने या दोन्ही आरोपीना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23 , दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून पुणे (Pune) , सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.