Chandrayaan 3 : चंद्राच्या दिशेने अंतराळयानाची प्रवासाला सुरुवात

एमपीसी न्यूज – चांद्रयानाने‌ (Chandrayaan 3) त्याच्या प्रक्षेपणानंतर आज (दि. 25) पृथ्वीभोवती निश्चित केलेल्या कक्षेमध्ये पाच परिक्रमा पूर्ण केल्या असून आता यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राभोवती निश्चित केलेल्या पहिल्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या नवीन माहितीनुसार, चांद्रयानाने पृथ्वीची पाचवी व शेवटची कक्षा पूर्ण केली आहे. आता यानाने 127609 किमी X 236 किमी या कक्षेत आपली परिक्रमा पूर्ण करणे अपेक्षित आहे. प्राप्त कक्षेसंदर्भातील माहितीची इस्रोद्वारे पुष्टी केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

Pune : चूक लक्षात आल्यावर पत्रकार मुकेश माचकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करून मागितली माफी

1 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 ते 1 या वेळेत हे यान चंद्राच्या पहिल्या कक्षेत (Chandrayaan 3) प्रवेश करणार आहे. 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 चे विक्रम लॅंडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.