Today’s Horoscope 29 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग…मंगळवार, दिनांक…29 सप्टेंबर 2020

  • शुभाशुभ… उत्तम दिवस.
  • आज विशेष… भौम प्रदोष.
  • राहूकाळ… दुपारी 03.00 ते 04.30
  • दिशा शूल…उत्तरेस असेल.
  • नक्षत्र… शततारका 24.48 पर्यंत, नंतर पूर्वाभाद्रपदा.
  • आजची चंद्र राशी… कुंभ.

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. आज दिवस लाभाचा आहे. रुसलेले आप्तस्वकीय जवळ येतील. आज म्हणाल ती पूर्व.


वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही आनंदाने स्वीकाराल व त्या पूर्ण ही कराल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.

मिथुन – (शुभ रंग – पांढरा)
कार्यक्षेत्रात आज काही अडचणींचा सामना करावा लागेल. कितीही राबलात तरी वरिष्ठांचे समाधान अशक्य. मानसिक शांतीसाठी संध्याकाळी सत्संगाकडे पाय आपोआप वळतील.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
कुणाकडून कशाची अपेक्षा करूच नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही. विरोधक सक्रिय असल्याने नोकरदारांनी बिनचूक कामास प्राधान्य द्यावे.

सिंह – (शुभ रंग – मोरपंखी)
कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज फक्त वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक अवघड कामे सोपी होतील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

.

कन्या – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे राहील. काही येणी असतील तर मागितल्यास मिळतील.

तूळ – (शुभ रंग – पिस्ता)
आज गृहसौख्याचा दिवस. काम उरकून लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा. जोडीदार आज आतुरतेने वाट बघत असेल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने तुम्ही आनंदित व्हाल.


वृश्चिक
– (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
शिक्षण क्षेत्राशी निगडीत व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना आज सासुबाईंकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकता येतील.

धनु – (शुभ रंग – नारिंगी)
महत्त्वाच्या एखाद्या कामासाठी भटकंती होईल. आज प्रवासात होणाऱ्या काही ओळखी भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या.

मकर – (शुभ रंग – क्रीम)
आज तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमता ही उत्तम असेल. विरोधकांशीही गोड बोलून आपला स्वार्थ साधू शकाल.

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)
लहरी आणि हट्टी स्वभाव काबूत ठेवा. तुमची मते सर्वांना पटतीलच असे नाही. महत्त्वाच्या चर्चेत थोडे सामंजस्य ठेवावे लागेल. आज तब्येत थोडीशी नरम असेल.

मीन – (शुभ रंग – निळा)
आज हाती असलेला पैसा जपून वापरा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा न टाळता येणारा खर्च उद्भवेल. एखाद्या प्रसंगी घरातील थोरांचे अनुभवाचे बोल विचारात घेणे गरजेचे आहे.

!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.