Today’s Horoscope 9 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 9 November 2023 
आजचा दिवस – गुरुवार.
तारीख – 09.11.2023
शुभाशुभ विचार – 17 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – वसुबारस, रमा एकादशी.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आज नक्षत्र – उत्तरा 21.57 पर्यंत नंतर हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————–
मेष – ( शुभ रंग – मेष)
बेरोजगारांच्या भटकंतीस यश येऊन त्यांना नोकरीच्या संधी येतील. मामा मावशी कडून काही महत्त्वाचे समाचार येतील. नोकरीत जास्त वेळ थांबून कामे पूर्ण करावी लागतील.

वृषभ ( शुभ रंग- आकाशी)
नवीन झालेल्या ओळखीतून व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. काही रसिक मंडळी आज कामावर दांडी मारून करमणुकीस प्राधान्य देतील. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस, कुटुंबीयांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. आज थोडे मुलांच्या अभ्यासातही डोकवावे लागेल. मुले आज्ञेत राहतील.

कर्क – ( शुभ रंग – डाळिंबी)
सामाजिक कार्यकर्त्यांना समाजाकडून आदर मिळेल. आज जास्त वेळ घराबाहेर जाईल. काही मोफत सल्ले देणारे भेटतील. आज कोणाशीही व्यर्थ वाद घालू नका.

सिंह -( शुभ रंग – मरून)
राशीच्या धनस्थानातून भ्रमण करणारा चंद्र आर्थिक सुबत्ता देईल. मनोबल उत्तम राहील. अहंकारास लगाम घालून मृदू वाणीने अनेक अवघड प्रश्न सोपे होतील.

Pune Firing: ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यात प्रसिद्ध सराफावर गोळीबार; हल्लेखोरांनी लुटले कोट्यवधींचे सोने!

कन्या – ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुमची द्विधा मनस्थिती राहील. कोणतेही निर्णय घेणे अवघड होईल. कार्यक्षेत्रात अनुभवींचे मार्गदर्शन जरूर घ्या. जोडीदाराचे म्हणणे समजून घ्यायला हवे.

तूळ ( शुभ रंग- लाल)
राशीच्या व्यय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढवेल. काही जणांना प्रवासाची तयारी करावी लागेल आज मुलांचे वाढते हट्ट तुम्ही हौशीने पुरवाल.

वृश्चिक ( शुभ रंग – सोनेरी) Today’s Horoscope 9 November 2023 
आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस आहे. विविध मार्गाने अर्थप्राप्ती होईल. काही कारणाने दुरावलेले आप्तेष्ट जवळ येतील. एखादा नवा उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस उत्तम.

धनु (शुभ रंग- भगवा)
ध्येयप्राप्ती साठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. वेळेचे योग्य नियोजन केल्याने अनेक किचिकट कामे सोपी होतील. वरिष्ठांची शाब्बासकी मिळवाल.

मकर (शुभ रंग- चंदेरी)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. किरकोळ कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. घरातील वडीलधारी मंडळीही आज आपलेच खरे करतील.

कुंभ – (शुभ रंग- पांढरा)
आज फक्त नाकासमोर चालणे हिताचे आहे. कोणतेही गैरव्यवहार टाळा. आज नीतीबाह्य वर्तन अंगाशी येऊ शकते. आपल्या प्रतिष्ठेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

मीन ( शुभ रंग- मोरपंखी)
जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर तरुण-तरुणींना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.

श्री जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.