Petrol and Diesel Price : पुण्यात पेट्रोल 91 रुपये, तर डिझेल 80 रुपये प्रतिलिटर

एमपीसी न्यूज : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनात कपात केल्यामुळे सध्या जगभरात तेलाचे दर कडाडले आहेत. मागील काही दिवसांपासून भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol and Diesel price) दर वाढले आहेत. आज पुण्यात पेट्रोलचा दर 90. 99 रुपये प्रतिलीटर वर पोहोचला आहे.

सध्याची वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलचे दर आगामी दोन दिवसांमध्ये 85 रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 91.32 रुपये आहे. तर परभणीत पेट्रोल 93.73 रुपयांवर पोहोचले असून राज्यात या जिल्ह्यात पेट्रोलचा दर सर्वांत जास्त आहे.

इंडियन ऑईलने (India Oil) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जानेवारी महिन्यात पेट्रोल 1 रुपयांनी महागले आहे. तर डिझेच्या दरामध्ये एक रुपयापेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 84.70 रुपये, मुंबईमध्ये 91.32 रुपये, कोलकातामध्ये 86.15 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 87.40 रुपये प्रतिलीटर आहे.

तर दिल्लीमध्ये डिझेलचा दर 74.88 रुपये प्रतिलीटर, मुंबईमध्ये 81.60 रुपये प्रतिलीटर, कोलकाता शहरात 78.47 रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये डिझेलचा आजचा दर 80.19 रुपये प्रतिलीटर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.