Tadoba Reservoir : वाघीणीसमोरच पर्यटक ‘जिप्सी’तून कोसळला; ताडोबा येथील घटना

एमपीसी न्यूज : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यंटकासोबत थरारक घटना घडली. कोअर झोनमध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या ‘जिप्सी’मधील एक पर्यटक काही अंतरावर माया वाघीण आणि तिचे बछडे असतानाच जिप्सीखाली कोसळला.

या घटनेमुळे काही वेळ पर्यटकांचा थरकाप उडाला होता. माया वाघीण व तिच्या बछड्यांचे छायाचित्र काढण्याच्या नादात पर्यटक कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सहकारी पर्यटकांनी त्याला वेळीच खेचल्याने पुढील अनर्थ टळला.

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातानंतर प्रशासनाला जाग, मार्गावर राबवणार विविध उपाययोजना

रविवारी ताडोबाच्या कोअर झोनमध्ये सकाळी जिप्सींना प्रवेश देण्यात आला. पांढरपौनी भागात माया वाघीण तिच्या बछड्यांसह जिप्सीसमोर आली. तेथे हजर सर्व पर्यटकांच्या नजरा मायावर खिळल्या. मात्र, अशातच नागपूर येथील पर्यटक किशोर कान्हेरे जिप्सीतून खाली कोसळले. सोबतीला असलेल्या पर्यटकांनी लगेच त्यांना खेचल्याने मोठा अनर्थ टळला.

माया वाघीण अचानक जिप्सीच्यासमोर आली असता चालकाने ब्रेक दाबल्यामुळे कान्हेरेंचा तोल गेल्याचे काही जण सांगत आहेत तर माया वाघीण व तिच्या बछड्यांचे छायाचित्र काढण्याच्या नादात त्यांचा तोल गेल्याचे प्रत्यक्षादर्शीनी सांगितले. या घटनेमुळे पर्यटक व वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वृत्ताला ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनीही दुजोरा दिला आहे. पर्यटनादरम्यान पर्यटक व जिप्सी चालकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.