Alandi : आळंदीमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये रविवार 18 डिसेंबर (Alandi) रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. प्रदक्षणा रस्ता, वडगांव रस्ता, मरकळ रस्ता, चाकण रस्ता इ. ठिकाणी रस्त्यावर बेशिस्तपणे दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

काल लग्नाची तिथी मोठी गर्दी असल्याने काही मंगल कार्यालयात कार्यासाठी आलेल्या वाहनांसाठी तिथे पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने तेथील जवळ असणाऱ्या काही रस्त्यावरच नागरिकांनी बेशिस्तपणे वाहने पार्किंग केल्याचे आढळून आले. समाधी दर्शन व इतर कारणास्तव आलेल्या काही नागरिकांनीसुद्धा रस्त्यावर बेशिस्तपणे आपली वाहने पार्किंग केल्याचे आढळून आले. तसेच, अवजड वाहनांनीदेखील वाहतूक कोंडीत भर टाकली. त्याचा त्रास मात्र आळंदीतील नागरिकांसह बाहेरील प्रवाशांनासुद्धा झाला.

Alandi Traffic

वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर पोलीस व वाहतुक पोलीस (Alandi) ही समस्या सोडवण्यासाठी परिश्रम घेत होते. तसेच, रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रविवारी दिवसभर गावात सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्याने तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. पुढील काळात लग्न तिथीला गावात वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता वाहतूक पोलीस प्रशासन कोणती उपाययोजना राबवेल? याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.

Pune News : 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.