Today’s Horoscope 19 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 December 2022
वार – सोमवार.
19.12.2022
शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.
आज विशेष- सफला एकादशी.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00
दिशा शूल – पूर्वेस असेल. आजचे नक्षत्र – चित्रा 10.31 पर्यंत, नंतर स्वाती.
चंद्र राशी – तुळ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- सोनेरी )
उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील आज तुम्ही एका विवाह जुळण्यास यशस्वी मध्यस्थी कराल. गरजूंना मदत कराल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया)
नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य होतील परंतु त्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणणे हिताचे राहील.

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )
सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज तुम्हाला प्रकृती उत्तम साथ देईल.

कर्क (शुभ रंग- राखाडी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमेळीचे वातावरण असेल. अत्यंत सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात कराल. आज तुम्ही इतरांच्या कामी याल.

सिंह (शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात आज विरोधकांशीही गोड बोलून आपला कार्यभाग साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

कन्या ( शुभ रंग- चंदेरी) – Today’s Horoscope 19 December 2022
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

तूळ ( शुभ रंग- केशरी )
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमच्या काटकसरी स्वभाव थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च तुम्हाला करावेच लागणार आहेत घरात थोरामोठ्यांच्या हो ला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात आपली तब्येत सांभाळा.

धनु- (शुभ रंग- आकाशी )
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अतिउत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तू वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल.

मकर ( शुभ रंग- निळा)
तुमच्या कार्यक्षेत्रातील अतिवस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांना वेळ देता येणार नाही. त्यामुळे त्यांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागेल. आज व्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे मनात येईल. जेष्ठ मंडळींनी सत्संगात राहावे. नोकरीत साहेबांची मर्जी सांभाळावी लागेल.

मीन (शुभ रंग – पिस्ता)
आज जे काही कराल ते तब्येतीस जपून करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच रहा जोडीदार जे सांगेल तेच आज योग्य असेल.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Alandi : आळंदीमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.