Palghar Gang Rape : महाराष्ट्राच्या घटनेने देश हादरला; 16 वर्षीय मुलीवर 8 जणांनी केला बलात्कार; ओरडू नये म्हणून अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला (Palghar Gang Rape) हादरवून टाकणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. एका 16 वर्षाच्या मुलीवर 8 तरुणांनी गॅंगरेप केल्याची बातमी समोर आली आहे. एवढेच नव्हे तर हा राक्षसी थरार तब्बल 15 तास चालू होता. या दरम्यान तिच्यावर अत्यंत घाणेरड्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले. ती ओरडू नये म्हणून तीच्या तोंडात ड्रग्ज तसेच लिंग घातले होते. तिचा गळा दाबून तिला अर्धमेल्या अवस्थेत सोडून दिले. हा गुन्हा दुसरे तिसरा कोणी नसून तिच्याच प्रियकराने घडवून आणला. पोलिसांच्या तक्रारीनंतर आठही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील माहीम भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्री 8 वाजता बेपत्ता झाली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शनिवारी दुपारी दोन वाजता सातपाटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला असता ती रडत होती. यानंतर पालघर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी तिचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांना पीडित तरुणी हरणवाडीत सापडली.

Alandi : आळंदीमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

बंद बंगल्यात बलात्कार केला – 

पीडित तरुणीची विचारपूस केली असता तिने सांगितले की, माहीम समुद्रकिनारी असलेल्या एका बंद बंगल्यात 8 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला झुडपात नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास एका मुलाने तिला गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या एका निर्जन ठिकाणी सोडले. त्याने आणि इतरांनी तिला लैंगिक शोषणाबद्दल बोलू नये म्हणून चेतावणी दिली.

पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत – 

पोलिसांनी सांगितले की, तरुणीने तिच्या मित्राचे नाव सांगितल्यानंतर त्याच्या अटकेनंतर अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपीने मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी लैंगिक कृत्याची व्हिडिओ क्लिप बनवली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले कपडे अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

विचित्र बलात्कार –

मुलीने आपल्यासोबत घडलेली क्रूर घटना सांगितल्यावर ऐकणाऱ्यांची मने हेलावून गेली. मुलीने सांगितले की, तिच्या प्रियकराने तिला भेटायला बोलावले आणि त्यानंतर तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मुलीने सांगितले की, बहुतेक आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले आणि मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचारही झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.