Pune News : पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’च्या कामामुळे हडपसर टर्मिनलवरून सुटणार गाड्या

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. हे काम येत्या काही दिवसांत सुरू केले जाणार आहे. (Pune News) या कामाचा प्रभाव काही गाड्यांच्या सेवेवर होणार असून तो टाळण्यासाठी काही गाड्या या आता पुणे रेल्वे स्थानकाच्या जवळून वळवण्यात येत आहे. येत्या 6 मार्च पासून पुणे-सोलापूर गाडी हडपसर टर्मिनल येथून सोडण्यात येणार असून, दौंड-पुणे गाडी हडपसरपर्यंत धावणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम तब्बल 290 दिवस चालणार आहे. पुणे रेल्वे स्थानकात काम सुरू झाल्यावर या स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्या या शिवाजीनगर, खडकी, हडपसर येथून सोडण्यात येणार आहेत. शिवाजीनगर स्थानकावरून आता लोकलसाठी स्वतंत्र लाइन तयार करण्यात आली आहे तर आता हडपसर टर्मिनलमधून देखील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जाणार आहे.

Today’s Horoscope 03 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

हडपसर टर्मिनलमधून सध्या हैदराबाद एक्स्प्रेस ही एकमेव गाडी सुटते. पुणे स्थानकात काम सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर आणि हडपसर या दोन टर्मिनलचा वापर रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे. हडपसर रेल्वे टर्मिनल येथून गाड्या वाढविण्यास सुरूवात झाली आहे.

पुणे-सोलापूर गाडी आता हडपसर टर्मिनलवरून सकाळी 8.35 वाजता सुटेल. दौंड-पुणे ही गाडी हडपसरपर्यंत धावेल. तिचे हडपसर टर्मिनलवर सकाळी 7.35 वाजता आगमन होईल.(Pune News) दरम्यान, पुणे-फलटण या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि फलटणला सकाळी 9.45 वाजता पोहोचेल, असे रेल्वेने कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.