Pune News : शनिवारी महावितरणमध्ये  ‘लाईनमन दिना’चे आयोजन

एमपीसी न्यूज : विजेच्या एका बटणामागे विस्तारलेल्या प्रचंड मोठ्या वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार (Pune News) दि. 4 मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये लाईनमन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जनमित्र म्हणजेच लाईनमन हे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत विविध ठिकाणी शनिवारी (दि. 4) ‘लाईनमन दिना’चे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’च्या कामामुळे हडपसर टर्मिलवरून सुटणार गाड्या

यामध्ये रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी 10 वाजता मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील.(Pune News) तसेच सर्वच ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये वीजसुरक्षेची शपथ, वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.