Today’s Horoscope 03 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 03 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – शुक्रवार.

03-03-2023

शुभाशुभ विचार- 9 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- आमलकी एकादशी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – पुनर्वसू 15.43 पर्यंत नंतर पुष्य.

चंद्र राशी – मिथुन 8.58 पर्यंत नंतर कर्क.

—————————————-

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- भगवा )

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च कराल. क्षुल्लक कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणास आवर घालायला हवा अन्यथा त्यामुळे काही चांगली नाती  दुरावतील.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )

आज तुम्ही काही से लहरीपणाने वागाल कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल उतावीळ पणाने घेतलेले काही निर्णय चुकतील. आज तुम्ही हातचे सोडून पळत्या मागे धावाल.

कर्क (शुभ रंग- मरून )

एखादी हरवलेली वस्तू परत सापडेल आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोडा मोठ्यांच्या वयाचा मान राखा. वाद वाढवू नका.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

आज तुमची महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडू शकतात. हातचे सोडून मृगजळा मागे धावायचा तुमचा प्रयत्न असेल.

कन्या ( शुभ रंग- जांभळा )

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

Chakan : आदर्श गावच्या आदर्श सरपंचांचा पितृप्रेम अन् पर्यावरण रक्षणाचा आदर्श

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद असतील.

वृश्चिक (शुभ रंग- लाल )

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. आज नास्तिक मंडळीही देवाला एखाद्या नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची साथ राहील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी )

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ मिळेल कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मकर ( शुभ रंग- आकाशी )

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी अजिबात अंगावर काढू नका. आज विश्रांतीही गरजेची आहे

कुंभ (शुभ रंग – मोतीया )

कलाक्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

मीन -(शुभ रंग – निळा )

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उटवस आनंदाने करतील.

 

 

 

 

  शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.