Trek : कातळधार धबधबा येथून तरुणीची सुटका

एमपीसी न्यूज – लोणावळ्याजवळ कातळधार धबधबाजवळ अडकलेल्या तरुणीची शिवदुर्गच्या सदस्यांनी सुखरूप सुटका केली आहे. ही घटना रविवारी (दि.31) रोजी घडली.

सुप्रिया गवने असे अडकलेल्या तरुणीचे नाव असून ती मुळची नागपूरची असून पुण्यात ती सध्या जॉब करते. लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यूटीमला फोन आला की कातळधार धबधब्याजवळ एक तरुणी एका मोठ्या दगडावरून घसरून पडली होती.यावेळी तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ती जागेवरची हलू शकत नव्हती.त्यांचा ट्रेकला सहा जणांचा ग्रूप आला होता.या ठिकाणी दुसऱ्या ग्रुपबरोबर गेलेली प्राजक्ता बनसोड (शिवदुर्ग सदस्या) होती. तिने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून फोन केला व मदतीची गरज असल्याचे सांगितले.

दीड तासात टिम घटनास्थळी पोहचली.पोहचल्यानंतर प्रथमोपचार करून स्ट्रेचरवरून घनदाट जंगलातून अतिशय अवघड व चढणीच्या वाटेने जखमी मुलीला रस्त्यापर्यंत आणले व त्यानंतर अम्ब्यूलन्समधून पुढील उपचारासाठी पुढे पाठवून दिले.

ही बचाव मोहीम शिवदुर्गच्या रोहीत वर्तक, समीर जोशी, योगेश उंबरे, अमोल परचंड, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, आनंद गावडे, राजेंद्र कडू, कुणाल कडू, अशोक उंबरे, चैतन्य वाडेकर, प्रणय आंभुरे, हेमंत पाटील, प्राजक्ता बनसोड, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, तुषार सातकर, सचिन वाडेकर, यश वाडेकर, मुंबई ट्रेकर – लियांडर वाझ, जोयेल विल्फ्रेड, सुशांत वायदंडे, व जय सोनार यांनी बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.