Crime News : सोमाटणे फाटा येथे महिलेचे अडीच तोळ्याचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथील अन्नपूर्णा हॉटेल समोरून पायी जाणाऱ्या महिलेचे अडीच तोळे वजनाचे गंठण चोरट्यांनी हिसकावून (Crime News) नेले आहे. ही घटना रविवारी (दि.31) सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

 

फिर्यादी महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात जणांविरोधात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रविवारी सोमाटणे फाटा येथून पायी घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आल्या व त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 1 लाख 25 हजार रुपयांचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. दोघेही चोर मुंबई-पुणे जुना महामार्गाने पळून (Crime News) गेले.यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.