Talegaon : ट्रेकिंग पलटण ग्रुपची कोंडेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ट्रेकिंग पलटण ग्नुप आज शुक्रवारी (दि 6) गौरी पूजनाच्या दिवशी ऐतिहासिक कोंडेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता केली. या ग्रुपची ही तीन वर्षातील २४ वी मोहीम होती. पुणे जिल्ह्यातील कामशेतपासून सुमारे २० किमी अंतरावर नाणे मावळातील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक कोंडेश्वर हे महादेवांचे मंदिर स्थित आहे.

चहुबाजूंनी धबधब्यांनी नटलेला कोंडेश्वर मंदिराचा हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच ढाक बहिरी, राजमाची, भीमाशंकर अशा वाटा येथून जातात. ट्रेकिंग पलटण ग्रुपच्या सदस्यांनी कोंडेश्वर परिसरातील धबधबे व कोकणकडा परिसरातील निष्काळजी पर्यटकांनी टाकून दिलेल्या पाण्याच्या व शीतपेयच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, बिस्कीट चिप्सचे पँकेट्स जमा करून परिसर स्वच्छ केला. परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धबधब्यांच्या आसपास पडलेला प्लास्टिक कचरा पलटणच्या सदस्यांनी काळजीपूर्वक गोळा केला. जिथे पोहोचणे धोकेदायक होते, तिथे मानवी साखळी करून प्लास्टिक गोळा केले. ट्रेकिंग पलटण ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेत प्रा. प्रदीप पाटील, प्रा. विलास कर्पे, पवन पाटील, ललित बागल आणि प्रा. डॉ. सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे नियोजन डॉ. सुरेश इसावे यांनी केले. त्यांना डॉ संदीप गाडेकर यांनी मदत केली.

परिसराला भेट देणाऱ्यांनी कचरा हा परिसरातील कचरा कुंडीतच टाकून कोंडेश्वर मंदिराचे पावित्र्य व स्वच्छता जपावी तसेच पर्यटकांनी सुद्धा या धबधब्यांच्या परिसरात तसेच कोकणकडा व ढाक बहिरी च्या वाटेवर कचरा टाकू नये व परिसर अधिक पर्यावरणपूरक ठेवण्याचे आवाहन  निमित्ताने ट्रेकिंग पलटण ग्रुपतर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.