Raireshwar Fort : ट्रेकिंगला आलेल्या विद्यार्थ्याचा हदयविकाराने मृत्यू; रायरेश्वर किल्ल्यावरील घटना

एमपीसी न्यूज – बारामतीहून भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Raireshwar Fort) निधन झाल्याची घटना येथे घडली.शुभम चोपडे असे मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

 

शुभम हा बारामतीमधील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत होता. या महाविद्यालयाचे 46 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांबरोबर तो रायरेश्वर किल्ल्यावर (Raireshwar Fort) ट्रेकींगसाठी जात होता.त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. सकाळी नऊ वाजता ते भोर रायरेश्वर मार्गावरील कोर्ले या ठिकाणाच्या एका हॅटेलवर नाष्टा करण्यासाठी थांबले होते.

 

विद्यार्थाला हदयविकाराचा झटका

नाष्टा झाल्यावर सगळे गाडीत बसण्यासाठी निघाले असताना शुभमला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच त्याला हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर शुभमला लगेचचं जवळच्या अंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

मित्रांना, शिक्षकांना मानसिक धक्का

शुभम हा मुळचा करमाळा तालुक्यातील उंब्रट गावाचा रहिवासी आहे, शिक्षणासाठी तो बारामती येथे राहत होता. शुभमच्या जाण्याने त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना जबर धक्का बसला आहे. अवघ्या 17 वर्षे वय असलेल्या शुभमचा हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.