Pune Accident : शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला

एमपीसी न्यूज – माल वाहतूक करणार्या डंपरने 13 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काटी गावात वडापुरी रोडवर शुक्रवारी घडली. तृप्ती नाना कदम असे मरण (Pune Accident) पावलेल्या मुलीचे नाव आहे. या हदयद्रावक घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी टिपर पेटवला.

 

या अपघातातबाबत माहीती अशी की, काटी येथे नानासाहेब कदम हे सकाळी दहाच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन कृष्णा (वय 11) व तृप्ती (वय 13) या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात होते. त्यावेळी रस्ते बांधकामावरील खडीने भरलेला हायवा वाहनाने बुलेटला मागून धडक दिली. यात तृप्ती ही मागील चाकाखाली (Pune Accident) आल्याने जागीच मरण पावली.या घटनेत नानासाहेब कदम व त्यांचा मुलगा कृष्णा हे दोघे जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. या प्रकरणी पोलिसांनी विनोद महादेव जवरे (वय 40 रा. खैरा जि. यवतमाळ) यास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.