Tilak National Award : ‘मिसाइल वुमन’ डॉ.थॉमस यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – ‘मिसाइल वुमन’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि अग्नी 4व 5 क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ.टेसी थॉमस यांना यंदाचा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Tilak National Award) जाहीर झाला आहे.

 

टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक व ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.टिळक महाराष्ट्र विद्यापीठात येत्या सोमवारी (दि.1) लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणार्या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल. त्या दिवशी चार वाजता हा कार्यक्रम होईल.

 

 

भारतीय संरक्षण क्षेत्राला बळ देणारे संशोधन डॉ.टेसी थॉमस यांनी केले आहे. लांब पल्ल्याच्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या क्षेपणास्त्राचे संशोधन करुन त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन हजार 500 किमी. पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या (Tilak National Award) पूर्ण झाली.त्यानंतर चार हजार, पाच हजार ते आठ हजार आणि आठ हजार ते दहा हजार किमी. पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी झाली. त्यांच्या कार्यासाठी विश्वस्तांनी यंदाच्या पुरस्कारासाठी थॉमस यांची निवड केल्याचे टिळक यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.