Sports News : जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला सुरुवात, 400 खेळाडू होणार सहभागी

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय (Sports News) कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथे  कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रामध्ये पार पडला.

या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महापालिकेचे उपआयुक्त रविकिरण घोडके, क्रीडाधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे समितीचे सचिव नंदू सोनवणे, सहसचिव रावसाहेब कानवडे, खजिनदार प्राची जोशी, सहखजिनदार सुदाम दाभाडे, स्पर्धा व्यवस्थापक हर्षवर्धन भोईर, अविनाश कदम, नंदकुमार साने, विनोद देसाई, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह खेळाडू, महापालिका कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

 

Pune Accident : शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला

 

या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन 29 ते 31 जुलै दरम्यान करण्यात आले आहे. प्रेमलोक पार्क येथील कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रात सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत पार पडणार आहेत.  पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 400 खेळाडू सहभागी (Sports News) होणार असून विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीसे तसेच स्मृतीचिन्हे  देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

 

दोन लाखांची बक्षीसे

जिल्हास्तर कॅरम स्पर्धा 2022-23 या स्पर्धेत पुरुष, महिला गट व ज्येष्ठ नागरिक गट असे एकूण 400 खेळाडू सहभागी होणार आहे. विज्येत्या खेळाडूंना रोख बक्षीसे, ट्रॉफीज देण्यात येणार आहेत. पुरुष गटात प्रथम येणा-याला 31 हजार, द्वितीय 25 हजार, तृतीय 20 हजार रुपये, चतुर्थ क्रमांक 15 हजार रुपये, पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक येणा-याला 7 हजार रुपये, ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश अशी 3 हजार 600 रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत.  एकूण 1 लाख 26 हजार 200 रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक गटात प्रथम येणा-याला 15 हजार, द्वितीय 11 हजार, तृतीय 7 हजार, चतुर्थ 5 हजार आणि पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक येणा-याला 3 हजार रुपये तर ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश अशी 3 हजार 600 रुपयांची दोन बक्षिसे अशी एकूण 57 हजार 200 रुपयांची या गटाला बक्षीसे दिली जाणार आहेत. तर, महिला गटात प्रथम येणा-याला 7 हजार, द्वितीय 5 हजार, तृतीय 3 हजार, चतृर्थ 2 हजार आणि ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिशची 3 हजार 600 रुपयांची दोन बक्षिसे दिली जाणार आहेत. या गटात 24 हजार 200 रुपये तर तीनही गटातील विज्येत्यांना 2 लाख 7 हजार 600 रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.