Tribeca : ट्रायबेकाची भारतात 5000 कोटींची गुंतवणूक

एमपीसी न्यूज : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशनने भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. (Tribeca) भारतातील अनेक शहरांमध्ये लक्झरी रेसिडेन्शिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योजना आहे. ट्रायबेका डेव्हलपरचे संस्थापक कल्पेश मेहता व डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी ही घोषणा केली आहे.

ट्रम्प यांची कंपनी भारतात एकूण तीन ते पाच निवासी प्रकल्पांवर काम करण्याचा विचार करत आहे लुधियाना, हैदराबाद, बंगळूर आणि चंदीगड यासारख्या देशातील मोठ्या शहरांमध्ये हे प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशन ने भारतात निवासी मालमत्ता बनवण्यासाठी ट्रायबेका डेव्हलपर्स या कंपनीची करार केलेला आहे. ही कंपनी मागील दहा वर्षापासून ट्रम्प ऑर्गनायझेशन बरोबर काम करत आहे.

Pune News : पुण्यात तीन ठिकाणी छापा टाकत सव्वा नऊ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

याबाबत माहिती देणार ट्रायबेका डेव्हलपरचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीने ट्रम्प ऑर्गनायझेशनची भागीदारी केली आहे. ट्रम्प यांची कंपनी देशाच्या विविध भागातील प्रकमावर काम करण्यासाठी एकूण पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कल्पेश मेहता यांनी सांगितले की, ट्रम्प यांची कंपनी आणि ट्रायबेका डेव्हलपर्सची भारतात एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.(Tribeca) यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सात ते आठ प्रकल्पांसाठी भागीदारी केली जाणार आहे. यामध्ये दोन्ही कंपन्या अडीच – अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प यांच्याकडे भारतात आधीपासूनच एकूण चार मालमत्ता आहेत. ज्याची किंमत अमेरिकेबाहेर सर्वाधिक आहे. ट्रम्प यांच्या कंपनीने दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे आणि कोलकाता येथे तयार केलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.