Pune News : पुण्यात तीन ठिकाणी छापा टाकत सव्वा नऊ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

एमपीसी न्यूज पुण्यातील मार्केटयार्ड, कोरेगाव पार्क व (Pune News) बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 लाख 34 हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई पुणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथक दोन यांनी केली आहे.

पोलिसांनी 10 डिसेंबर रोजी छापा टाकत निलेश विलास बांगर (वय 40 रा. पिंपळगाव) याला अटक केले.त्यानंतर 11 डिसेंबर रोजी सुरेश सिद्धराम नाटेकर (वय 33 रा. मार्केडयार्ड,पुणे) याला अटक करून 2 लाख 31 हजार रुपयांचा 231 ग्रॅम वजनाचे चरस व मोबाईल जप्त केला. त्यानंतर 13 डिसेंबर रोजी सापळा रचून पोलिसांनी आकाशचंद्र पार्थव नायक (वय 27 रा. ओडिसा) याला ताब्यात घेऊन 4 लाख 83 हजार 530 रुपयांचा 24 कॉल 178 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

PCMC News : रस्त्याचे काम निकृष्ठ; कार्यकारी अभियंत्यांसह चौघांची विभागीय चौकशी सुरु

तसेच 15 डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत पुणे स्टेशन येथे सापळा रचून जावेद अजीज सय्यद (वय 33 रा.कोंढवा) याला अटक करून 2 लाख 20 हजार रुपयांचा 11 ग्रॅम वजनाचा (Pune News) एम.डी. जप्त केले आहेत. सर्व आरोपींवर एन.डी..पी.एस. कलमाअतंर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.