Pune News : वारजेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दगडफेक

एमपीसी न्यूज : वारजेत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले पान शॉप बंद करण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दगडफेक केल्याचा (Pune News) प्रकार उघडकीस आला आहे. वारजे परिसरातील गणपती माथा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिग्विजय ककाराम वाघमारे (वय 19), व्यंकटेश प्रमोद पिळवणकर (वय 19), अमोल निलेश पवार, लाल्या खान, आप्पा लोंढे, खंड्या वाघमारे यांच्यासह आणखी तीन ते चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी दिग्विजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गोविंद भारत फड (वय 39) या पोलीस कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात तीन ठिकाणी छापा टाकत सव्वा नऊ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके हे फिर्यादी यांच्यासोबत कोथरूड विभागात रात्रगस्तीवर होते.(Pune News) यावेळी त्यांना गणपती माथा येथील रॉयल पान शॉप समोर गर्दी दिसल्याने पान शॉप बंद करण्यासाठी आणि गर्दी हटवण्यासाठी ते थांबले होते. गर्दीत असलेल्या आरोपींनी जमाव करून फिर्यादी यांच्या दिशेने दगडफेक करत सरकारी कामात अडथळा आणला. त्यानंतर शेजारीच असणाऱ्या गल्लीत ते पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.