Chakan : सायकलच्या कटावणीने घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सायकल स्टँडच्या कटावणीने घरफोडी (Chakan ) करणाऱ्या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घरफोडी रविवारी (दि.21) चाकण येथील वृषभ समृद्धी सोसायटी येथे घडली होती.

याप्रकऱणी अखिल जॉन (वय 29 रा.चाकण) यांनी फिर्याद दिली असून रोशन अरविंद सोनावणे (वय 25 रा.कुरुळी) व शुभम हनुमंत वाघमारे (वय 23 रा.कुरुळी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Pune : स्वारगेट सातारा रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सायकलच्या कटावणी ने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला होता. त्यांनी घरातील बॅग व महागडा गॉगल असा एकूण 2 हजार 900 रुपयांचा एवज चोरला होता. चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Chakan ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.