Pune : स्वारगेट सातारा रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज- स्वारगेट सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोर (Pune) रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या अशोक लेलँड मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये ट्रक खाली चिरडून दुचाकी वरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

दुर्गा कुंडलिक जावळकर (वय 54) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ट्रक चालक कन्नू स्वामी सुभैया देवर (वय 62) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी वंदना रामदास भरेकर आणि दुर्गा कुंडलिक जावळकर या दुचाकीने जात होत्या. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यासमोरील स्वारगेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी यांच्या दुचाकीला आरोपीच्या ट्रकने जोराची धडक दिली.

यावेळी दुर्गा कुंडलिक या खाली कोसळल्या आणि ट्रकची चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.