Pune : प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज- पत्नी सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून दोघांनी एका (Pune) तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सिमेंटच्या गट्टू ने डोक्यात मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटील स्टेट झोपडपट्टीत रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी  खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.विशाल मिसाळ आणि अमर मिसाळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

Ambegaon : जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने डोक्यात वार; गुन्हा दाखल

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. रविवारी रात्री फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह घरी असताना आरोपी घरात आले. फिर्यादीच्या भावाचे आरोपीच्या पत्नीसोबत प्रेम संबंध असल्याचा आरोप करून त्यांनी फिर्यादी यांच्या घरावर सिमेंटचा गट्टू मारला. फिर्यादीच्या डोक्यावर त्यांनी सिमेंटचा गट्टू मारून फिर्यादी यांचा भाऊ अक्षय गवळी याला धक्काबुक्की करत मारहाण केली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.